Congress President Election : मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरूर? आज फैसला | पुढारी

Congress President Election : मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरूर? आज फैसला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  (Congress President Election) कोण विजयी होणार याचा फैसला बुधवारी (19 ऑक्टोबर) होणार असून मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे.

Back to top button