श्रीनगर, पुढारी ऑनलाईन डेस्क – काश्मीरमध्ये शोपियान परिसरात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली आहे. दक्षिण काश्मीरमधील चौधरी गुंड परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी हा परिसर सील केला आहे. या हत्येच्या निषेधार्थ काश्मिरी पंडितांनी जोरदार निदर्शने केली आहेत. Kashmiri Pandit killed in Shopian
पुरन किशन भट त्यांच्या घरी जात होते, त्या वेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना जखमी अवस्थेत नजिकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.
भट यांच्या हत्तेवर काश्मिरी पंडित संघंर्ष समितीने संताप व्यक्त केला आहे. समितीचे अध्यक्ष संजय टिक्कू म्हणाले, "काश्मीरमध्ये सर्व काही ठीक चाललेले आहे, असे नाही. आणि हेच या हत्येने दाखवून दिले आहे. काश्मीरमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले आहे, हे दाखवण्यासाठी भट यांच्यावर लगेच अंत्यसंस्कार करावेत, यासाठी त्यांच्या कुटुंबावर प्रशासन दबाव आणत आहे." या हत्येविरोधात काश्मिरी पंडितांनी निदर्शने केली आहेत.
हेही वाचा