भूतबाधेच्या संशयातून बापानेच केला पोटच्या मुलीचा खून | पुढारी

भूतबाधेच्या संशयातून बापानेच केला पोटच्या मुलीचा खून

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  केरळमधील नरबळी प्रकरणाने देशभर खळबळ माजलेली असतानाच आता गुजरातमधील धावा गावात वडिलांनी 14 वर्षीय मुलीचा अंधश्रद्धेतून अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूतबाधा झाल्याच्या संशयातून काळी जादू करताना मुलीचा नाहक बळी गेल्याची घटना गीर सोमनाथ जिल्ह्यातील धावा गावात घडली आहे.

आरोपी वडील भावेश अकबारी सहा महिन्यांपूर्वी सुरतमधून धावा गावात आले होते. या गावात भाऊ दिलीपच्या सोबतीने त्यांनी
त्यांच्या अल्पवयीन मुलीवर जादूटोणा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलीला चाखिलदार मैदानात नेण्यापूर्वी जुने कपडे घालण्यास सांगण्यात आले. नंतर दोन्ही आरोपींनी मुलीला शेकोटीजवळ दोन तास उभे केले. त्यानंतर मुलीचे कपडे
जाळून तिला मारहाण केली. पीडितेच्या केसांना काठी बांधून तिला दोन खुर्च्यांमध्ये उभे केले. अनेक तासांपर्यंत या मुलीला तहानलेले आणि उपाशी ठेवत तिचा क्रूर छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

 एवढेच नव्हे तर या भयावह घटनेचे पुरावेदेखील आरोपींनी नष्ट केले आहेत. या मुलीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आला होता.

Back to top button