पत्नी-मुले सांभाळण्यास सक्षम नसेल, तर मुस्लिम व्यक्ती दुसरे लग्न करू शकत नाही : उच्च न्यायालयाची टिप्पणी | पुढारी

पत्नी-मुले सांभाळण्यास सक्षम नसेल, तर मुस्लिम व्यक्ती दुसरे लग्न करू शकत नाही : उच्च न्यायालयाची टिप्पणी

प्रयागराज : वृत्तसंस्था : एखादी मुस्लिम व्यक्ती आपल्या पत्नी व मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसेल, तर ती दुसरे लग्न करू शकत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. यावेळी न्यायालयाने कुराणाचा संदर्भही दिला.

इस्लामिक कायदा पहिली पत्नी असताना मुस्लिम व्यक्तीला दुसरे लग्न करण्याचा अधिकार देतो. पण त्याला पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध
न्यायालयाकडून जबरदस्तीने बरोबर राहण्याचा आदेश मिळविण्याचा अधिकार नाही. पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे म्हणजे पहिल्या पत्नीबरोबर क्रूरता आहे. ज्या समाजात महिलांचा सन्मान केला जात नाही, त्यांना सभ्य समाज म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच कौटुंबिक न्यायालयाद्वारा पहिल्या पत्नीला पतीबरोबर तिच्या मनाविरूद्ध राहण्याचा आदेश देण्यास नकार देणारा निर्णय योग्य ठरविला.

Back to top button