काही एअरपॉड्सचे उत्पादन चीनमधून भारतात हलवणार | पुढारी

काही एअरपॉड्सचे उत्पादन चीनमधून भारतात हलवणार

नवी दिल्ली;  पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गत उत्पादनास चालना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला आणखी एक मोठे यश आता मिळाले आहे. कारण अ‍ॅपल इंकने आपल्या पुरवठादारांना काही एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोनचे उत्पादन प्रथमच भारतात हलवण्यास सांगितले आहे. निक्केई  या वृत्तपत्राने बुधवारी हे वृत्त दिले.

अँपल आय फोन असेंबलर फॉक्सकॉन भारतात बीट्स हेडफोन बनवण्याच्या तयारीत आहे. पुढच्या काळात आपल्या देशात देखील एअरपॉड्स तयार करण्याची आशा असल्याचे या बातमीत एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे. लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट ?ी, ही आयफोन निर्मितीला मदत करणारी चिनी पुरवठादार कंपनी आहे. ती आणि त्याची युनिट्स देखील अ‍ॅपलला भारतात एअरपॉड्स बनविण्यात मदत करण्याची योजना आखत आहेत, असेही या बातमीत म्हटले आहे . तथापि, लक्सशेअर सध्या आपल्या व्हिएतनामी एअरपॉड्स ऑपरेशन्सवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. भारतात अ‍ॅपल उत्पादनांचे उत्पादन सुरू करण्यात स्पर्धकांपेक्षा तिचा वेग कमी असू शकते, असेही या वृत्तपत्राचे म्हणणे आहे.

अ‍ॅपलकडे याबाबत टिप्पणीसाठी विचारणा केली असताना रॉयटर्सच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद मिळालेला नाही. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखली जाणारी अ‍ॅपल कंपनी आयफोन उत्पादनाची काही क्षेत्रे चीनमधून भारतासह इतर बाजारपेठांमध्ये हलवत आहे. या कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला आयफोन 13 चे उत्पादन चीन मध्ये सुरू केले. आयपॅड टॅब्लेट असेंबल करण्याची योजना देखील ती आखत आहे. तथापि कंपनीने गेल्या आठवड्यात भारतात नवीनतम आयफोन 14 तयार करण्याची आपली योजना जाहीर केली.

मंगळवारच्या ब्लूमबर्ग न्यूजच्या बातमीत म्हटले आहे की एप्रिलपासून पाच महिन्यांत भारतातून आयफोन निर्यातीने 1 अब्ज डॉलर्सचा
आकडा ओलांडला आहे . मार्च 2023 पर्यंत 12 महिन्यांत तो 2. 5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. अ‍ॅपलचे नवे धोरण आपल्या उपकरणांचे
उत्पादन चीनमधून हळूहळू काढून घेऊन ते भारत, मेक्सिको आणि व्हिएतनामसारख्या देशात हलविण्याचे आहे. त्यामुळे कंत्राटी उत्पादनाच्या आघाडीवर भारतासारख्या देशाचे महत्व अमेरिकेच्या नजरेत वाढत आहे. चीनमधील कोविड-संबंधित लॉकडाऊन आणि वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणाव वाढत असण्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल घडत असल्याचे निक्केई ने म्हटले आहे

Back to top button