खर्गे यांच्यासमवेत मतभेद नाहीत : शशी थरूर | पुढारी

खर्गे यांच्यासमवेत मतभेद नाहीत : शशी थरूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक हालचालींना जोर आला आहे. आम्ही एकमेकांशी लढायचे नसून भाजपशी लढायचे आहे, या मल्लिकार्जुन खर्गेे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे ट्विट काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी केले आहे. माझ्यात आणि खर्गे यांच्यात काहीच मतभेद नसून पक्षात जी-समूहासारखा कोणताही गट नसून हे सर्व माध्यमांनी घडवून आणल्याचे थरूर म्हणाले.

अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून मतदारांनी मतदान करताना केवळ भाजपला रोखावयाचे आहे, हे लक्षात ठेवावे.
आम्ही गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षाला मजबूत करण्याचे काम करायचे आहे. भाजपचे आव्हान परतावून लावण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही थरूर यांनी केले.

दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी सार्वजनिकरीत्या चर्चा करण्यास तयार असून यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि योग्य त्या उमेदवाराला ते मतदान करतील. अशा प्रकारची चर्चा नुकतीच ब्रिटनमध्ये झालेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झाली होती, असे वक्तव्य शशी थरूर यांनी रविवारी केली होती. काँग्रेसला भाजप आणि संघाच्या विरोधात एकत्रितरित्या लढायचे, असल्याचा पलटवार खर्गे यांनी केला होता.

Back to top button