UP Accident : उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघात २७ जण ठार | पुढारी

UP Accident : उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघात २७ जण ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (UP Accident) मोठी दुर्घटना घडली. शनिवारी देवदर्शनाला निघालेली ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने 11 मुले आणि 11 महिलांसह 27 जणांचा मृत्यू झाला. तसेच आणखी 30 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फतेहपूरहून घाटमपूरला जात असणारी ट्रॅक्टर ट्रॉली ही ५० यात्रेकरूंना घेऊन चंद्रिका देवी मंदिराच्या “मुंडन” सोहळ्याला जात होती. सार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भदेउना गावाजवळ ही ट्रॉली पलटी होऊन तलावात पडल्याने मोठा अपघात झाला. पोलीस आणि बचाव पथकानी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. (UP Accident)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. “कानपूरमधील ट्रॅक्टर-ट्रॉली दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” असे पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button