BOB recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये ३४६ अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

BOB recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये ३४६ अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने ३४६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून २० ऑक्टोबरपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बँक ऑफ बडोदाने शुक्रवारी (दि. 30) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर ३२० जागा, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजरच्या 24 जागा, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) १ पद आणि ऑपरेशंस हेडच्या १ जागेसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. आजपासून (दि.30) अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. अर्ज करताना, उमेदवारांना ६०० रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फक्त १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

… तरच तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात

बँक ऑफ बडोदाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवारच सर्व पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित पदानुसार कामाचा अनुभव किमान एक वर्षांचा असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे १ ऑक्टोबर रोजी वय २४ ते ४० पर्यंत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news