पुढारी ऑनलाइन डेस्क : 5-G service पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5-G सेवेचा प्रारंभ झाला आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात आज शनिवारी (दि.1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 G सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात देशातील तेरा महानगरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
चारदिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे मोदी यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमात हाय-स्पीड मोबाईल इंटरनेट सुविधेच्या लाँचिंगदरम्यान 5-जी सेवांच्या कार्याचे प्रात्यक्षिक देखिल पाहिले.
5-G service 10 कोटी लोक तयार (5-G service)
रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात प्रथम हाय-स्पीड 5-जी इंटरनेट देण्याची तयारी पूर्ण केली आहे. 2023 मध्ये देशातील 10 कोटींहून अधिक लोकांना 5-जी सेवा वापरायची आहे. या लोकांकडे 5-जी नेटवर्कसाठी आवश्यक स्मार्टफोनही आहेत. दरम्यान, 70 हजारांहून अधिक लोक इंडियन मोबाईल काँग्रेसला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात देशातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
5-G service या शहरांत सर्वप्रथम 5-जी सेवा
5-जी सेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी मेट्रो शहरांचा समावेश आहे. त्यानंतर दोन वर्षांत 5-जी कनेक्टिव्हिटी देशभरात वेगाने विस्तारली जाईल. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनौ या 13 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे.