अनिल चौहान यांनी स्वीकारला सीडीएस पदाचा कार्यभार | पुढारी

अनिल चौहान यांनी स्वीकारला सीडीएस पदाचा कार्यभार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून ले. ज. (सेवानिवृत्त) अनिल चौहान यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. लष्कराच्या तिन्ही दलांचे आधुनिकीकरण, त्यांच्यात लवचिकता आणणे तसेच भविष्यातील युद्धासाठी लष्कराला तयार करणे आदी आव्हाने चौहान यांच्यासमोर आहेत.

लष्कराच्या पूर्व विभागाचे माजी कमांडर असलेल्या चौहान यांच्याकडे जम्मू-काश्मीर तसेच ईशान्य भारतातील दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडण्याचा दीर्घ अनुभव आहे.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे नऊ महिन्यांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. तेव्हापासून सीडीएसपद रिकामे होते. लष्कराच्या तिन्ही दलांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवे सीडीएस अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button