Congress Vs BJP : ‘गांधी टोपी’वरून भाजप नेत्याने छेडला वाद | पुढारी

Congress Vs BJP : 'गांधी टोपी'वरून भाजप नेत्याने छेडला वाद

अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन : स्वातंत्र्य लढातील इतिहासातील काॅंग्रेस नेत्यांवरून भाजप (Congress Vs BJP) नेहमीच कोणता कोणता वाद निर्माण करत असते. तो वाद नेहमीच पुढे येत राहिला आहे. आज पुन्हा एका भाजप नेत्याने ‘गांधी टोपी’वरून वाद छेडलेला आहे. त्यावर काॅंग्रेसनेही प्रत्युत्तर दिलेले आहे.

भाजपच्या गुजरात युनिटचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर यांनी म्हंटलं की, “महात्मा गांधी कधीही गांधी टोपी घातलेली नव्हती. ती गांधी टोपी नेहमी पंडीत जवाहरलाल नेहरू परिधान करायचे”, त्यांच्या या विधानानंतर भाजप आणि काॅंग्रेस आमने-सामने आलेली आहे.

गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी या विधानाला दुजोरा देत म्हंटलं आहे की, “संबंधित टोपी ही गांधी टोपी म्हणून ओळखली जात असली तरी ही टोरी राष्ट्रपितांनी कधीही घातली नाही. प्रत्यक्ष गांधींना कोणीही गांधी टोपी घातलेलं पाहिलेलं नाही.”

गांधी टोपीवरून छेडलेल्या वादग्रस्त मुद्द्याला गुजरात काॅंग्रेसकडून प्रत्युत्तर आलेलं आहे. काॅंग्रेसने म्हंटलं आहे की, “जे कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते. ज्यांनी इंग्रजांनी नेहमी मदत केली. ते आता देशाच्या पहिल्या पंतप्रधानांवर बोलत आहेत”, असं खोचक उत्तर काॅंग्रेसने दिलेलं आहे.

इतिहासातील विविध मुद्द्यांवरून भाजप आणि काॅंग्रेसमध्ये (Congress Vs BJP) नेहमीच वाद होत आले आहेत. गांधी टोपीवरून भाजपने छेडलेल्या मुद्द्यावरून काॅंग्रेसनेही जशास तसे उत्तर दिलेले दिसते. पण, पुन्हा एकदा हा मुद्दा छेडल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदीर…

Back to top button