XXX Web Series : बोल्ड सीन प्रकरणी एकता कपूर अडचणीत; बिहार न्यायालयाने पाठविले अटक वॉरंट | पुढारी

XXX Web Series : बोल्ड सीन प्रकरणी एकता कपूर अडचणीत; बिहार न्यायालयाने पाठविले अटक वॉरंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बिहारच्या बेगुसराय दिवाणी न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. हे वॉरंट ट्रिपलएक्स वेब सिरीज (XXX Web Series) संदर्भात आहे. या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीबद्दल एक आक्षेपार्ह सीन दाखवण्यात आला आहे. हा लष्कराचा अपमान असल्याने गेल्या वर्षी बेगुसराय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.

२०२१ मध्ये लष्कराचा अपमान झाले आहे असे माणून एकता कपूर निर्मातीच्या वेब सिरिजवर बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या संदर्भात माहिती देत असताना बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी ट्रिपलएक्स सीझन-2 ही वेब सीरिज (XXX Web Series) बनवली होती. देशाचे रक्षण करणारे भारतीय सैनिक हे या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. यामध्ये एक आक्षेपार्ह सीन दाखण्यात आला. निर्मात्याने हे निंदनीय कृत्य केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे.

काय आहे वेबसिरिजमध्ये?

जेव्हा सैनिक ड्युटीवर असतो, तेव्हा त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना लष्कराचा गणवेश घालून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आमंत्रित करते. पाठक यांनी सांगितल्यानूसार सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. ते ड्युटीवर असतात तेव्हाच आपण सुखाची झोप घेतो. त्यांच्याबद्दल असा चित्रपट बनवणे हा भारतीय लष्कराचा अपमान आहे.

हेही वाचा

Back to top button