चित्रा रामकृष्णन यांना जामीन; योगीच्या सल्ल्याने चालवत होत्या शेअर बाजार

चित्रा रामकृष्णन यांना जामीन; योगीच्या सल्ल्याने चालवत होत्या शेअर बाजार

पुढारी ऑनलाईन – हिमालयातील एका योगीच्या सूचनेवरून राष्ट्रीय शेअर बाजार चालवण्याचा आरोप असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) माजी अध्यक्ष चित्र रामकृष्णन यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. तसेच NSEचे ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमणियन यांनाही ही जामीन मंजूर झाला आहे. (Chitra Ramkrishna Bail)

या दोघांवर मनी लॉड्रिंग, कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करणे, पाळत ठेवणे असे आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणात २०१८मध्ये गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर चित्रा रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांना या वर्षी अटक झाली होती. या प्रकरणात तपास सुरू असताना चित्रा रामकृष्णन या हिमालयातील एका योगीच्या सूचनेनुसार निर्णय घेतात, असेही पुढे आले होते.

रामकृष्णन यांनी स्वत:च्या पदाचा लाभ घेत, सुब्रमण्यम यांची बेकायदेशीर नियुक्ती केली होती, असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रामकृष्णन या अनधिकृत इमेलचा वापर करत होत्या आणि हा इमेल अकाऊंट सुब्रमण्यम सांभाळत होते, असेही पुढे आले होते.

हेही वाचा

Exit mobile version