Meme on Mamata Banerjee :  ममता बॅनर्जी यांच्यावर मीम्स करणं पडलं महागात; युट्यूबरला अटक  | पुढारी

Meme on Mamata Banerjee :  ममता बॅनर्जी यांच्यावर मीम्स करणं पडलं महागात; युट्यूबरला अटक 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावर मीम्स व्हायरल करणं महागात पडलं आहे.  ममता बॅनर्जी यांच्यावर अपमानास्पद मीम्स पोस्ट (Meme on Mamata Banerjee) केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका युट्यूबरला अटक केली आहे. तर इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भाषणाच्या व्हिडिओमधील काही फुटेज घेवून त्यावर काही युट्यूबर्सनी मीम्स केले होते. हे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दास या व्यक्तीने तक्रारीत आरोप केला आहे की, या युट्यूबर्सनी काही मिम्स पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या भाषणातील काही फुटेज वापरले आहे. ही मीम्स अपमानास्पद आणि बदनामीकारक आहेत. यामुळे राज्याच्या विविध भागात दंगली होऊ शकतात, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. “त्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी हे मीम्स प्रसारित केले आहेत.

Meme on Mamata Banerjee : आणखी ६ जणांवर गुन्हा दाखल 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे. तुहीन मोंडल (३०) असे आरोपीचे नाव असून तो ताहेरपूर, नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध तरताळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी सहाजणांवर अपमानास्पद मीम्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

मिम्स म्हणजे काय? 

मीम्स फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप सारख्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अलिकडे मीम्सचे करण्याचे प्रमाण वाढत आहे. मीम हे दिसायला जरी छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. उदा. शिंदे गटाने जेव्हा बंड केले तेव्हा शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मीम्सच्या कमी शब्दात जास्तीत जास्त आशय यातून मांडला जातो. Meme चा फुल फॉर्म ‘Mostly Entertain Material Ever’ आहे असा मानला जातो.

हेही वाचलंत का?

Back to top button