Kiran Varma : ‘त्‍या’ घटनेमुळे त्‍यांचे आयुष्‍याचे बदलले; रक्तदान जनजागृतीसाठी नोकरी सोडून ‘ते’ रस्त्यावर उतरले

Kiran Varma
Kiran Varma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्यांच्या आयुष्यात एक मन हेलवणारी टाकणारी घटना घडली. रक्‍तदानाचे महत्त्‍व त्‍यांना पटले. त्‍यानंतर त्‍याने मल्टिनॅशनल कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि रक्तदान जनजागृतीसाठी हाच त्‍याचा आयुष्‍याचा ध्‍यास झाला. त्‍याचा हा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी आहे.  ही गोष्ट आहे दिल्लीतील ३७ वर्षीय किरण वर्माची. (Kiran Varma) जाणून घेवूया, किरण यांच्‍या आयुष्‍याला कलाटणी देणार्‍या घटनेविषयी…

Kiran Varma : दिवसभर चालणे हे माझ्यासाठी आव्हान

दिल्लीतील ३७ वर्षीय तरुण किरण वर्मा. चेंज विथ वन फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. या संस्थेअंतर्गत  सिंपली ब्लड आणि चेंज विथ वन मील हे दोन उपक्रम राबवले जातात. ते गेले काही महिने रक्तदान जनजागृतीसाठी पायी प्रवास करत आहेत. या प्रवासाची सुरुवात २८ डिसेंबर २०२१ राेजी झाली.  किरण यांनी नुकतीच  तब्बल सहा महिन्यांनंतर  हैदराबादमध्ये पत्नी आणि मुलाची भेट घेतली. तो रक्तदानाविषयी जनजागृतीच्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा दिवसभर चालणे शक्य नव्हते. दिवसभर चालणे हे माझ्यासाठी आव्हान होते. आणि ते अजुनही आहे. ही रोजची लढाई आहे, असे ते सांगतात.

'त्‍या' घटनेने बदलले जीवन

किरण यांनी छत्तीसगडमधील एका कुटुंबातील व्यक्तीला रक्तदान केले होते. काही दिवसांनी किरणने त्या कुटूंबाशी संवाद साधला ते्व्हा त्यांना कळले की, एक मध्यस्थीने रक्तासाठी त्या कुटूंबाकडून १५०० रुपये घेतले होते. ज्या व्यक्तीला रक्त दिले होते ती कॅन्सरग्रस्त होती. त्याच्‍या पत्‍नीीला आजारी पतीचं वैद्यकीय बिल भागवण्यासाठी वेश्याव्यवसायाकडे वळावे लागले होते. मन हेलावून टाकणारी ही घटना किरणच्या जिव्हारी लागली.  त्यांनी मल्टिनॅशनल कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि रक्तप्रचारासाठी स्व:ताला वाहून घेतले.

28 डिसेंबर 2021 रोजी तिरुअनंतपुरम येथून चालण्यास सुरुवात केलेल्या किरण यांनी  किरण नुकताच  गुलबर्गा येथून  हैदराबादला पोहोचले आहेत. सर्व राज्यांमधील सर्व राजधानी शहरे पार करुन, 2024 पर्यंत  राजधानी दिल्ली येथे पोहचण्याचे त्‍यांचे त्‍यांचे उद्दीष्ट्य आहे. रक्तदान जनजागृतीसाठी त्‍यांची कृती काैतुकास्‍पद ठरली आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news