
पुढारी ऑनलाईन डेस्क : कुल्लू जिल्ह्यातील बंजार व्हॅलीमधील घियागी भागात पर्यटकांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर वाहन कठड्यावरून खाली कोसळले. यामध्ये तब्बल सात जणांचा मृत्यू झाला असून रविवारी रात्री साडेआठच्या सुमारा हा अपघात घडला. सुमारे १० जण जखमी झाल्याचे कुल्लूचे पोलिस अधिक्षक गुरूदेव सिंग यांनी दिली.
हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३०५ वर काल रात्री पर्यटकांचे वाहन रस्त्यावरून खाली कोसळले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच १० जण जखमी झाले आहेत. ५ जखमींना कुल्लू येथील झोनल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुल्लू जिल्ह्याचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी प्राथमिक अहवालानुसार कारमध्ये चालकासह 17 लोक असल्याचे सांगितले.
कुल्लूचे पोलिस अधिक्षक गुरुदेव शर्मा यांनी सांगितले की, घियागीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला असुन स्थानिक लोकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत पाच मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून १० जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :