तब्बल ६६ टक्के भारतीय वैमानिक कॉकफिटमध्ये झोपतात; सर्वेतील निष्कर्ष

Indian Pilots Sleep in Cockpit

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल ६६ टक्के भारतीय वैमानिक हे विमान चालवत असताना विमानातील कॉकफिटमध्ये (Indian Pilots Sleep in Cockpit) झोपत असल्याचे मान्य केले आहे. या बाबतचा एक सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये तब्बल ५४२ वैमानिकांनी भाग घेतला. दरम्यान हे मान्य करत असताना झोपणाऱ्या काही वैमानिकांनी आपण झोपत असल्याचे सहकारी वैमानिकास सुद्धा सांगत नसल्याचे कबुल केले.

देशांतर्गत, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान चालविणाऱ्या वैमानिकांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला होता. तसेच एपवर्थ स्लीपनेस स्केलच्या (Epworth Sleepiness Scale) माध्यमातून वैमानिकांच्या झोपण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५४ टक्के वैमानिकांना अधिक तीव्र झोप येते तर ४१ टक्के वैमानिकांनी मध्यम स्वरुपाची झोप येण्याची समस्या असल्याचे सांगितले. सेफ्टी मॅटर्स फौंडेशन नावाच्या एनजीओने हा सर्वे केला आहे. (Indian Pilots Sleep in Cockpit)

सततचे व अधिकचे काम, वर्कलोड, कामाचे ताण अशा कारणामुळे शारीरिक व माणसिक थकवा येतो. यामुळे वैमानिकांना झोप लागण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन संघटनेचे (ICAO) म्हणणे आहे.


अधिक वाचा :

Exit mobile version