मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांच्या भेटीत नेमकं घडलं? | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांच्या भेटीत नेमकं घडलं?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी रात्री उशिराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. उभय नेत्यांदरम्यान झालेल्या ४० मिनिटांच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या जागांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी सहा जागा मिळण्याची शक्यता या भेटीनंतर आता वर्तवली जात आहे.

या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून दिली आहे. शहा यांच्या भेटीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय कायदा मंत्र्यांसोबत चर्चा केली होती. तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची देखील त्यांनी भेट घेतली होती.

दोन दिवशीय दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे गुरूवारी संध्याकाळपर्यंत कुठल्याही केंद्रीय नेत्यांसोबत भेट झाली नव्हती. शहा यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता कमीच होती. पंरतु, रात्री उशिराने ते शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंबंधी २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. यासंबंधीदेखील शिंदे आणि शहा यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button