मारूती सुझुकी कंपनीने पावणे दोन लाख वाहने परत बोलवली | पुढारी

मारूती सुझुकी कंपनीने पावणे दोन लाख वाहने परत बोलवली

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : भारतातील कार बनवणारी नामांकित मारूती सुझुकी (maruti suzuki) कंपनीने १ लाख ८६ हजार वाहने मागे बोलवली आहेत. या मारूती सुझुकी (maruti suzuki) कंपनीच्या गाड्यांमध्ये सेफ्टीचा अभाव असल्याने या दुरूस्तीसाठी परत मागवल्या आहेत. कंपनीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये हा दोष आढळून आला आहे.

कंपनीच्या माहितीनूसार ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० या काळात १ लाख ८६ हजार वाहने परत बोलवण्यात येणार आहेत. या वाहनांमध्ये सुरक्षेविषयी काही उणीवा आढळून आल्या आहेत.

तपासणी केल्यानंतर परिणाम झालेले सर्व सुटेभाग मोफत बदलून देण्यात येतील.

याबाबत कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपमधून ग्राहकांना संपर्क करण्यात येणार आहे. सियाझ, एर्टिगा, व्हिटारा ब्रीझा, एस-क्रॉस आणि एक्सएल-६ या मॉडेल्सचा त्यात समावेश आहे.

नोव्हेंबरपासून या वाहनांची दुरुस्ती प्रक्रिया सुरू होणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळात वाहनधारकांनी पाण्याच्या भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.

सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कंपनीच्या किरकोळ चुकीमुळे कंपनीला कामाचा ताण वाढणार आहे.

आपले वाहन या यादीत आहे का हे पाहण्यासाठी कंपनीने वेबसाईटवर सुविधा सुरू केली आहे. यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित मॉडेलच्या लिंकवर जाऊन चेसीस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध मिळणार आहे.

चेसीस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असतो. तसेच वाहनाचे बिल आणि नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये देखील नमूद केलेला असतो.

Back to top button