बायकोला ८ वर्षांनी समजले नवरा लग्नाआधी बाई होता! लिंगबदलाची शस्त्रक्रिया केलेल्या नवरोबाला अटक

बायकोला ८ वर्षांनी समजले नवरा लग्नाआधी बाई होता! लिंगबदलाची शस्त्रक्रिया केलेल्या नवरोबाला अटक
Published on
Updated on

वडोदरा : पुढारी ऑनलाईन – एखाद्याच्या बायकोने स्वप्नातही विचार केला नसेल असा प्रकार गुजरातमधील वडोदरा येथे उघडकीस आला आहे. बायकोला ८ लग्नाच्या आठ वर्षांनंतर समजले की तिचा नवरा लग्नापूर्वी पुरुष नाही तर स्त्री होता. या महिलेने गोत्री येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुष बनलेल्या या महिलेने लग्नावेळी हा प्रकार लपवला होता, आणि यातून आपली फसवणूक झाली आहे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. (Vadodara Marriage Case) या महिलेचे लग्न २०१४ला झाले होते. या तक्रारीत सदर महिलने अनैसर्गिक संभोगाचा आरोपाही लावला आहे.

लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुष झालेल्या या व्यक्तीचे नाव डॉ. विराज वर्धन असे आहे. विराजचे स्त्री असतानाचे नाव विजैता होते.
तक्रारदार महिला आणि डॉ. विराज यांची ओळख एका विवाहसूचक वेबसाईटवरून दिल्लीत झाली होती. तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून १४ वर्षांची मुलगी आहे. या महिलेच्या पहिल्या पतीचे निधन २०११ला एका अपघातात झाले होते.

तक्रारीत या महिलेने म्हटले आहे की, "लग्नानंतर आम्ही हनिमूनसाठी काश्मीरला गेलो. पण डॉ. विराज शरीरसंबंध ठेवण्याचाशी उत्सुक नसायचा. मी फारच मनधरणी केल्यानंतर एका अपघातामुळे मी संबंध ठेवू शकत नाही. पण एका शस्त्रक्रियेनंतर सर्व काही सुरळीत होईल, असे विराज याने सांगितले होते." डॉ. विराज त्यानंतर वजन कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया करतो म्हणून कोलकत्याला गेले, पण विराजने पुरुष लिंग बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोलकोत्याला गेलो होतो, असे नंतर सांगितले, असे या महिलेने म्हटले आहे.
या प्रकरणात गोत्री पोलिसांनी डॉ. विराजला दिल्लीतून अटक केली असल्याची माहिती, गोत्री पोलिस स्टेशनचे निरीक्षक एम. के. गुर्जर यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news