
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जेईई अॅडव्हान्स 2022 चा निकाल रविवारी जाहीर झाला. कर्नाटकच्या आर. के. शिशिर याने कॉमन रँक लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
मुलींमध्ये आयआयटी दिल्लीची तनिष्का काबरा पहिली आली आहे. यंदा 1 लाख 60 हजार 38 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 1 लाख 55 हजार 538 विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपर दिले. त्यातील 40 हजार 712 पात्र ठरले आहेत. शिशिर याने 360 पैकी 314 गुण संपादले आणि तनिष्काने 360 पैकी 277 गुण मिळवले. प्रतीक साहू, माहीत गढीवाला, विशाल बयसानी, अरिहंत वशिष्ठ यांनीही या परीक्षेत धवल यश मिळवले आहे. ही परीक्षा 28 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या सर्व 23 शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या बीई, बीटेक आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सहा परीक्षांचे निकाल दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात आले. सीईटी सेलकडून शनिवारी बी. एड.-एम.एड,बी. ए. बी. एस सी बी. एड, आणि एम.एड या अभ्यासक्रमांचे निकाल सायंकाळी 7 वाजल्यानंतर जाहीर करण्यात आले. 11 सप्टेंबरला एलएलबी-5 वर्ष, एमसीए आणि एमबीए/ एमएमएस या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. निकाल लागलेल्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. तसेच यापूर्वी जाहीर केलेले निकालाचे तात्पुरते वेळापत्रकाऐवजी अंतिम वेळापत्रकही सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा निकाल व अंतिम वेळापत्रक सीईटी कक्षाच्या ुुु.ारहरलशीं.ेीस च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंटस्ने सीए फाऊंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार डिसेंबर सत्रासाठी 14, 16, 18 आणि 20 डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 14 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ळलरळ.ेीस या अधिकृत वेबसाईटवर माहिती मिळेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे. तर विलंब शुल्कासह 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. देश-विदेशातील 277 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.