Gold Price Today : सोने पुन्हा झाले स्वस्त; तपासा आजचा भाव - पुढारी

Gold Price Today : सोने पुन्हा झाले स्वस्त; तपासा आजचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात आज शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात घसरण दिसून आली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) ६६ रुपयांनी कमी होऊन ४७,२०८ रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचला. चांदीच्या दरातही किलोमागे ४३४ रुपयांची घसरण झाली.

काल गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर दुपारच्या सत्रात ४७,२२४ रुपयांवर होता. त्यानंतर त्यात वाढ होऊन तो ४७,२७४ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात आज शुक्रवारी दुपारच्या सत्रात घसरण दिसून आली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,२०८ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,०१९ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,२४३ रुपये, १८ कॅरेट ३५,४०६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,६१७ रुपये होता. (Gold Price Today)

तर चांदीचा प्रति किलो भाव ६३,१५८ रुपये होता.

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

अमेरिकेतील आर्थिक स्थिती आणि महागाईच्या शक्यतेने सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सराफ
gold file photo

गेल्या वर्षी सोने उच्चांकी पातळीवर म्हणजे ५६ हजारांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचले होते. सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ हजार रुपयांनी कमी आहे.

हे ही वाचा :

Back to top button