Income Tax Raid : महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानसह देशात शंभर ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी | पुढारी

Income Tax Raid : महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानसह देशात शंभर ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानसह देशातील शंभर ठिकाणी आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या. गैरमान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या. या पक्षांनी मोठ्या प्रमाणात कर चोरी केल्याचा आयकर विभागाचा संशय आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार गैर मान्यता प्राप्त राजकीय पक्ष, त्यांच्याशी संबंधित संस्था आणि ऑपरेटर्सविरोधात ही कारवाई सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणूक आयोगाने अलिकडेच राजकीय पक्षांबरोबर 87 संस्थांना आरयुपीपीच्या सुचीतून हटविले होते. नियम आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या गैर मान्यता प्राप्त 2100 राजकीय पक्षांविरोधात कारवाई सुरु असल्याचे त्यावेळी आयोगाकडून सांगण्यात आले होते. काही राजकीय पक्षांनी गंभीर वित्तीय अनियमितता केल्याचा आयोगाचा संशय आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button