पंतप्रधानांकडून शिक्षक दिनी 'पीएम-श्री' योजनेची घोषणा | पुढारी

पंतप्रधानांकडून शिक्षक दिनी 'पीएम-श्री' योजनेची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिक्षक दिवसांचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ५ सप्टें), शिक्षण क्षेत्रातील एक मोठी घोषणा केली. पंतप्रधानांनी ट्वीट करीत प्रधानमंत्री स्कुल्स फॉर रायजिंग इंडिया योजने अंतर्गत देशभरात १४ हजार ५०० शाळांचा कायापालट केला जाणार असल्याची घोषणा केली. या शाळांना मॉडेल स्कुल स्वरूपात विकसित केले जाईल.

पीएम-श्री शाळेत शिक्षण प्रदान करण्याची एक आधुनिक, परिवर्तनवादी तसेच समग्र पद्धत असेल.नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ तसेच इतर बाबींसह आधुनिक पायाभूत सुविधावर लक्ष दिले जाईल, अशी माहिती ट्विटर वरून पंतप्रधानांनी दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने नुकतेच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणले आहे. पीएम-श्री शाळांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. केंद्र सरकार च्या या योजने नुसार संपूर्ण देशभरात खासगी शाळांहुन अधिक चांगल्या सरकारी शाळा उभारल्या जातील. याच शाळांचे नाव पीएम-श्री राहील.

सद्य स्थितीत केंद्रीय विद्यालय संघटनेतर्फे संपूर्ण भारतात शाळांचे संचालन करते. तर, पीएम-श्री शाळा केंद्रीय विद्यालयांपेक्षा वेगळ्या राहतील. एकप्रकारे या शाळा राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रयोगशाळा असेल, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. भविष्याचा वेध घेऊन या शाळांमधे विद्यार्थ्यांना पूर्णतः सुसज्जीत केले जाईल. या शाळांमधे शिक्षणादरम्यान एक शोध उन्मुख, शिक्षण केंद्रित पद्धतीवर भर दिला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button