
सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाचा भारत जोडो यात्रा' सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम आहे. आजच्या 'महागाई वर हल्ला बोल' रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वैद्यकीय उपचारासाठी देशाबाहेर गेल्याने त्या उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत गेल्या असल्याने त्याही या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत रामलीला मैदान आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात असून सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?