
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 900 खटले 15 खंडपीठाकडे सुपूर्द केले आहेत. प्रत्येक खंडपीठाकडे 60 खटल्यांची जबाबदारी देण्यात आली असून सकाळी साडेदहा ते सायंकाळी चार या वेळेत खंडपीठांना सुनावणी घेऊन हे खटले निकाली काढायचे आहेत.
सरन्यायाधीश लळीत यांनी जे प्रमुख खटले खंडपीठाकडे सोपविले आहेत, त्यांना कर्नाटकातील हिजाब विवाद, केरळचा पत्रकार सिद्दीक कप्पन याच्या जामीनअर्जाचा खटला, गौतम नवलखा यांच्यासंदर्भातील खटल्यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी गेल्या शनिवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. मात्र सुट्ट्यांमुळे सलग दोन दिवस कामकाज झाले नव्हते. त्यानंतर आज, सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी लळीत यांनी कामाचा धडाका दाखवित 900 खटले 15 खंडपीठांकडे सोपविले आहेत.
हेही वाचा :