
पुढारी ऑनलाईन : काँग्रेस युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी निदर्शनास आला होता. याची माहिती पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिली होती. काँग्रेसने युट्यूब आणि गुगल यांच्याकडे संपर्क करत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पक्षाचे युट्यूब चॅनेल पुन्हा लवकरात लवकरत पुर्ववत करण्याची मागणी केली होती. आज 48 तासानंतर काँग्रेस युट्यूब चॅनेलची सेवा पुर्ववत झाली आहे.
यानंतर आज पुन्हा हे डिलीट झालेले काँग्रेसचे युट्यूब चॅनेल पुर्ववत झाल्याची माहिती पुन्हा काँग्रेसने आपल्या ट्विटर वरून दिली आहे. काँग्रेसने या ट्विटमध्ये 'आम्ही परत आलो आहोत, अधिक माहिती आणि तपशिलासाठी आमचे युट्यूब चॅनेल ट्यून करा' असे म्हटले आहे.
युट्यूब चॅनेल डिलीट झाल्यानंतर काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, आमचे युट्यूब चॅनेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) डिलीट करण्यात आले आहे. आम्ही ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे काही तांत्रिक कारणामुळे झाले की हॅकिंगमुळे, याचा तपास सुरू आहे. हे कसे घडले याबद्दल आणची YouTube आणि Google टीमशी चर्चा सुरू असल्याचेही या निवेदनात म्हटले होते.