Asaram Bapu : सुप्रीम कोर्टाने फेटाळला आसाराम बापूंचा जामीनअर्ज | पुढारी

Asaram Bapu : सुप्रीम कोर्टाने फेटाळला आसाराम बापूंचा जामीनअर्ज

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Asaram Bapu लहान मुलीवर बलात्कार केल्याचा तसेच लैंगिक छळवणुकीचा गंभीर आरोप सिद्ध झालेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आसाराम बापू यांनी जामीन मागितला होता. तथापि न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला.

अधिक वाचा :

आयुर्वेदिक उपचार घ्यावयाचे असल्याने तूर्तास शिक्षा लांबणीवर ढकलावी, अशी विनंती आसाराम बापू यांनी वकिलामार्फत केली होती. पण तुम्ही केलेला गुन्हा गंभीर आहे, त्यामुळे तुरुंगाबाहेर सोडू शकत नाही. काय उपचार घ्यायचे ते तुरुंगातच घ्या, अशी टिप्पणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने केली.

अधिक वाचा :

बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आम्ही फक्त दोन महिन्यांचा जामीन मागत आहोत, असा युक्तिवाद यावर आसाराम बापूंचे वकील आर. वसंत यांनी केला.

आसाराम बापू यांचे वय ८५ वर्षे आहे, ते तरी विचारात घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. मात्र जामीन देण्यास खंडपीठाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

अधिक वाचा :

Back to top button