पेट्रोल-डिझेल दर सलग सातव्या दिवशी स्थिर | पुढारी

पेट्रोल-डिझेल दर सलग सातव्या दिवशी स्थिर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल  दरांनी गेल्या सात दिवसांपासून दिलासा दिला आहे. इंधनांच्या दरात गेल्या आठवड्याभरात कुठलाही बदल झाला नाही. २४ ऑगस्टला १५ पैशांची कपात झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल  दर स्थिर आहेत. यापूर्वी १७ जुलै ते २१ ऑगस्ट पर्यंत ३५ दिवस पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता.

ऑगस्ट महिन्यात पेट्रोलचे दर फक्त ३५ पैशांनी कमी झाले आहेत. तर, डिझेल ९५ पैशांनी स्वस्त झाले आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोलचे दर १०१.४९ रुपये प्रति लीटर नोंदवण्यात आले. तर, डिझेलची ८८.९२ रुपये दराने विक्री केली जात आहे. मुंबईत पेट्रोल १०७.५२ रुपये प्रति लीटर आहे. तर, डिझेलची किंमत ९६.४८ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०१.८२ रुपयांनी, तर डिझेल ९१.९८ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९९.२० रुपये आणि डिझेल ९३.५२ रुपये प्रति लीटर आहे.

देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त आहेत. सरकार त्यांचे नियमन करीत नाही.परंतु, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीवर इंधनांची किंमती अवलंबून असते. जेव्हा ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात ४ महिन्यांच्या निचांकावर घसरला. तेव्हा क्रूड ६६ डॉलर प्रति बॅरलवर गेले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही मोठी कपात झालेली नाही. आता ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा ७३ डॉलरवर आले आहे. अशा स्थितीत आता किंमतींमधून दिलासा मिळण्याची फारशी शक्यता नाही.

पेट्रोलच्या किंमतीच्या ६० टक्के हिस्सा केंद्रीय उत्पादन आणि राज्य करांचा असतो. तर डिझेलचा हिस्सा ५४ टक्के आहे. पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क ३२.९० रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलवर ३१.८० रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती साधारणपणे दररोज बदलतात. बेंचमार्क आंतरराष्ट्रीय क्रूड किंमती आणि परकीय चलन दरावर आधारित आहेत.

वर्षभरात पेट्रोल १९.४६ रुपयांनी महागले

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७३ डॉलर आहे. यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

यावर्षी आतापर्यंत पेट्रोलचे दर ३८% वाढले आहेत.

मार्च आणि एप्रिलमध्ये, जेव्हा ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या, तेव्हा दर बऱ्यापैकी बर्‍यापैकी स्थिर राहिले.

उलट मार्चमध्ये तीन वेळा आणि एप्रिलमध्ये एकदा इंधन दरामध्ये कपात करण्यात आली होती.

एका वर्षात पेट्रोलचे दर १९.४६ रुपयांनी वाढले आहेत. ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर ८२.०३ रुपये होता.

हेही वाचलं का ? 

 

 

 

Back to top button