Anna Mani : कोण आहेत ॲना मणी?; ज्यांच्यामुळे भारतीय हवामान मोजमाप आणि अंदाज लावणे झाले शक्य

Anna Mani : कोण आहेत ॲना मणी?; ज्यांच्यामुळे भारतीय हवामान मोजमाप आणि अंदाज लावणे झाले शक्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सर्च इंजिन असलेल्या गुगलने भारतीय हवामान शास्त्रज्ञ ॲना मणी यांच्या १०४ व्या वाढदिवसानिमित्त खास डुडल बनवत शुभेच्छा दिल्या आहेत. ॲना मणी यांचे हवामान अंदाज यंत्राच्या डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. जी यंत्रे भारतातील हवामानाचा अंदाज आणि मोजमाप करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. सर्च इंजिन गुगलने २३ ऑगस्ट म्हणजेच आज भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांच्या कार्याची दखल घेत, त्यांच्यावर खास डुडल बनवले आहे.

ॲना मणी यांचा जन्म त्रावणकोर (केरळ) मध्ये झाला होता. त्या देशातील पहिल्या महिला शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्या विज्ञानातील या कार्यामुळेच भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावण्यास शक्य झाले. ॲना मणी यांना वाचनची लहानपणापासूनच प्रचंड आवड होती. त्या १२ वर्षाच्या होईपर्यंत त्यांनी सार्वजनिक वाचनालयातील सर्व पुस्तके वाचून काढली होती. एवढ्या लहान वयातील त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची बौद्धिक जडणघडण देखील चांगल्याप्रकारे झाली होती.

मणी यांनी महिला ख्रिश्चन कॉलेज (WCC) मध्ये इंटरमिजिएट सायन्स कोर्स केला. प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात ऑनर्ससह बॅचलर ऑफ सायन्स पूर्ण केले. पदवीनंतर, त्यांनी WCC मध्ये एक वर्ष शिकवण्याचे काम केले. त्यानंतर त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर येथे पदव्युत्तर अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळविली. यानंतर त्यांनी संशोधनाला सुरूवात केली. नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिरे आणि माणिकांमध्ये विशेष स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास केला. १९४२ आणि १९४५ दरम्यान, त्यांनी पाच शोधनिबंध प्रकाशित केले व पीएचडी पूर्ण केली.

१९४८ मध्ये लंडनमधून त्या मायदेशी परतल्या. त्यानंतर त्यांनी भारतीय हवामान विभागासाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी देशाला स्वत:ची हवामान उपकरणे डिझाइन आणि ते तयार करण्यास मदत केली. मणी यांच्या नेतृत्वाखाली भारताने १०० हून अधिक उपकरणे तयार केली आहेत. त्यानंकर त्या हवामान विभागात्या उपसंचालक बनल्या. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९८७ मध्ये त्यांना विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी INSA के. आर. रामनाथन पदकाने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news