आसाम : गोलपारा जिल्ह्यात ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी जेरबंद | पुढारी

आसाम : गोलपारा जिल्ह्यात 'अल कायदा'चे दोन दहशतवादी जेरबंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम पोलिसांनी शनिवारी रात्री गोलपारा जिल्ह्यातून दोन दहशतवादी जेरबंद केले. हे दाेघे अल-कायदा भारतीय उपमहाद्वीप(AQIS) आणि अंसारूल्लाह बांग्ला टीम (ABT)च्‍या संपर्कात असल्याचे पुरावे मिळाल्याने ही कारवाई करण्‍यात आली. चौकशीदरम्यान दाेघांनी दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोलपारा पोलीस अधीक्षक व्ही.व्ही.राकेश रेड्डी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांचे थेट दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. बांगलादेशातून आलेल्या जिहादी दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबरच त्यांना रेशन पुरवले होते. जिल्ह्यात स्लीपर सेलची भरती करण्यासाठी AQIS चा सदस्य असल्याचीही एकाने कबुली दिली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांचा अल-कायदाशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याकडील जिहादी घटक, पोस्टर्स आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.  त्यांचे मोबाईल फोन, सिमकार्ड आणि ओळखपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.

यापूर्वीही तीन संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वीही पोलिसांनी आसामच्या गोवालपाडा जिल्ह्यातील एका कारवाई दरम्यान तीन संशयित जिहादींना पकडले आहेत. अब्दुस शोभन अली आणि जलाल उद्दीन अशी दोघांची नावे असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. आसाम पोलिस संशयित जिहादी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वयाने काम करत आहे.

हेही वाचा : 

Back to top button