Corona Active Patient : देशभरात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट | पुढारी

Corona Active Patient : देशभरात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 13 हजार 272 ने वाढ झाली असून 36 लोकांचा बळी गेला असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून शनिवारी देण्यात आली. दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 166  (Corona Active Patient) पर्यंत कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या आता 4 कोटी 43 लाख 27 हजार 890 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 5 लाख 27 हजार 289 वर पोहोचला आहे.

(Corona Active Patient) एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.23 टक्के इतके आहे. रिकव्हरी दर 98.58 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. चोवीस तासात सक्रिय रुग्णांची संख्या 664 ने कमी झाली आहे. कोरोनाचा दैनिक सक्रियता दर 4.21 टक्के इतका नोंदविला गेला असून साप्ताहिक सक्रियता दर 3.87 टक्क्यांवर आला असल्याची माहितीही आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button