बजरंग दलाने कामसूत्रला लावली आग | पुढारी

बजरंग दलाने कामसूत्रला लावली आग

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बजरंग दलाने कामसूत्रला लावली आग : अहमदाबादमध्ये 28 ऑगस्टच्या रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर ‘कामसूत्र’ पुस्तकाच्या प्रती जाळल्या. या लोकांचा आरोप आहे की पुस्तकात कामसूत्राच्या नावाने हिंदू देवदेवतांची चित्रे वापरली गेली आहेत.

याच्या निषेधार्थ बजरंग दलाचे संयोजक जवलित मेहता आणि त्यांचे काही सहकारी अहमदाबादच्या एसजी महामार्गावरील अक्षांश नावाच्या पुस्तकांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांनी कामसूत्र पुस्तकाच्या प्रती जाळल्या.

तसेच पुस्तक विक्रेत्यांना धमकी दिली की यावेळी त्यांनी दुकानाबाहेर पुस्तक आणले आहे आणि पुस्तक जाळले आहे, परंतु जर विक्री सुरू राहिली तर दुकानासह पुस्तकेही जाळली जातील.

‘कामसूत्र’ हे आचार्य वात्स्ययन यांनी रचले होते. अजिंठा, एलोरा, खजुराहो आणि कोणार्कच्या शिल्पांप्रमाणेच वात्स्यायनचे कामसूत्र शतकानुशतके भारताचा अभिमान राहिले आहे.

बजरंग दल ही विश्व हिंदू परिषदेची संघटना आहे, जी धर्माशी संबंधित मुद्यांबाबत खूप आक्रमक आहे. संघटनेने अनेक प्रकरणांमध्ये उघडपणे विरोध केला आहे.

दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अनेक लोक दुकानाच्या बाहेर रस्त्यावर ठेवून पुस्तकाच्या प्रती जाळत आहेत.

बजरंग दलाने कामसूत्रला लावली आग : कानपूर प्रकरणानंतर पुन्हा चर्चेत

सुमारे 15 दिवसांपूर्वीही बजरंग दल चर्चेत होता. कानपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप करत एका मुस्लीम तरुणाला जाहीर मारहाण केली होती. या दरम्यान तिची मुलगी रडत होती. पण गर्दीत सामील लोक त्या तरुणाला मारहाण करत असताना जय श्री रामचा जयघोष करत राहिले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. अटकेनंतर 12 ऑगस्टच्या रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डीसीपी कार्यालयाला घेराव घातला.

या दरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली. लोकांनी डीसीपी रवीना त्यागी यांच्या कार्यालयासमोर बसून हनुमान चालीसाचे पठण केले.

Back to top button