को-विनचे नवे प्लॅटफॉर्म होणार लाँच; आरोग्य मंत्रालय | पुढारी

को-विनचे नवे प्लॅटफॉर्म होणार लाँच; आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : देशाच्या युनिव्र्हसल इम्युनायझेशन कार्यक्रमाचा अंतर्भाव करीत एक नवे को-विन प्लॅटफॉर्म सप्टेंबर महिन्यात लॉच केले जाणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हे प्लॅटफॉर्म चालविले जाणार असून टप्प्या-टप्प्याने त्यात अनेक सुविधांचा समावेश केला जाणार आहे.

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील दोन जिल्हे पायलट प्रकल्पात समाविष्ट केले जातील. को-विन प्लॅटफॉर्मवर कोविड 19 लसीकरण तसेच प्रमाणपत्र जारी करण्याचे काम पूर्ववत सुरुच राहणार आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आल्यानंतर रेकॉर्डसहित सर्व लसीकरण प्रणाली डिजिटल होईल. यामुळे नागरिकांना माहिती तात्काळ काढणे सोपे होईल. सध्याची लसीकरणाची माहिती मॅन्यूअल स्वरुपात जमा केली जाते. सध्या विविध आजारावरील बारा प्रकारच्या लसी आरोग्य खात्याकडून दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा

Back to top button