दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची तिसरी लाट कमी तीव्रतेची! | पुढारी

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची तिसरी लाट कमी तीव्रतेची!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची तिसरी लाट कमी तीव्रतेची : कोरोना महारोगराईची तिसरी लाट हळूहळू डोकं वर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशात दुसरी लाट ओसरल्यानंतर निश्चिंत झालेल्या नागरिकांना पुन्हा सतर्क होण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोना महारोगराईची तिसरी लाट सप्टेंबर अथवा ऑक्टोबर दरम्यान येवू शकते, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) वर्तवला आहे. पंरतु, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी तीव्रतेची राहील, असा अंदाज  आयसीएमआरकडून वर्तवण्यात आला आहे.

कोरोनाची तिसरी लाट कमी तीव्रतेची

देशात तिसरी लाट कधी येईल, याचा अंदाज कोणालाच वर्तवता येणार नाही. परंतु, जिल्हा किंवा राज्य निहाय डेटावरुन एक अंदाज बांधणे शक्य होईल.

राज्यांनी जर विचार न करता निर्बंध काढले तरच लाट उसळी घेईल तसेच जलद गतीने पसरणारा व्हेरिएंट किंवा कोरोना नियमांचे पालन न केल्यास रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते, असा अंदाज आयसीएमआरचे साथरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ.समीरन पांडा यांनी वर्तवला आहे.

लसीकरणामुळे पुढील लाटेसाठी कारणीभूत ठरणारे घटक आता कमी होत आहेत. पंरतु,डेल्टा सारख्या नव्या वेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यातच कोरोना नियमांचे उल्लंघन, लसीचा तुटवडा यांसारख्या गोष्टींची भर पडते.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा फैलाव कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यंदा रुग्ण अधिक वाढू शकतात. तर, ज्या जिल्ह्यांमध्ये मागील लाटेत अधिक रुग्ण होते तिथे रुग्णसंख्येत घट पाहायला मिळेल, असेही पांडा म्हणाले.

हे ही वाचलं का?

Back to top button