पश्‍चिम बंगालमध्‍ये ‘अल कायदा’चे दोन संशयित दहशतवादी जेरबंद

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील दहशवाद विरोधी दलाने  (एसटीएफ)  दहशतवादी संघटना अल कायदाच्‍या दोन संशयित दहशतवाद्‍यांना अटक केली आहे. त्‍याच्‍याकडे आक्षेपार्ह साहित्‍य जप्‍त करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

२४ परगना जिल्‍ह्यातील खारीबाडी परिसरात अल कायदाच्‍या संपर्कात असलेले संशयित दहशतवादी असल्‍याची माहिती 'एसटीएफ'ला मिळाली होती. त्‍यानुसार अब्‍दुर रकीव आणि काजी अहसानुल्‍लाह या दोघांना अटक करण्‍यात आली. अब्‍दुर हा दक्षिण दिनाजपूर जिल्‍ह्यातील गंगारापूर येथील रहिवासी आहे. तर काजी अहसानुल्‍लाह हा हुगली जिल्‍ह्यातील आरामबाग येथील आहे.

दोघाही संशयिताकडून देशविरोधी कारवायाचे संकेत देणारे आक्षेपार्ह साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे. या दोघांच्‍या संपर्कात असणार्‍या १७ जणांचाीही चौकशी करण्‍यात येणार आहे. लवकरच त्‍यांनाही अटक करण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news