
पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील तीन दिवस १० राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने म्हटलं आहे की, पुढील तीन दिवस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१७ आणि १८ ऑगस्ट रोजी सौराष्ट्र आणि कच्छमधील काही परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर गोवा आणि कोकणमध्ये २० तारखेपर्यंत पावसाची हजेरी असणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटलं आहे. मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुनेचा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत प्रतितास चार सेंटीमीटरने वाढ होत आहे. कछारी परिसरात पूराचा धोका वाढला आहे.परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गुना, राजगढ, आगर मालवा, रतलाम, नीमच आणि मंदसौर जिल्ह्यांनाही पुराचा धोका कायम आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशामध्ये मागील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. १० जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. अनेक नद्यांची वाटचाल धोका पातळीकडे सुरु आहे. सखल भाग जलमय झाल्याने अनेक जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु झाले आहे.
हेही वाचा :