अवनी लेखारा : संकटाशी झुंजत 'सुवर्ण'ला गवसणी घालणारी मुलगी | पुढारी

अवनी लेखारा : संकटाशी झुंजत 'सुवर्ण'ला गवसणी घालणारी मुलगी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्‍साही आणि खेळकर मुलगी अशी तिची ओळख होती. १२ वर्षांची असताना एका भीषण अपघाताने तिचे आयुष्‍यच बदललं. तिला पॅरेलेसिसचा (अर्धांगवायू) झटका आला. एक क्षणात होताच नव्‍हतं झालं. आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त करणार्‍या या घटनेने व्‍हिलचेअरवरुन तिचा नवे आयुष्‍य सुरु झाले. एक स्‍वप्‍न भंगले म्‍हणून कोलमंडून न जाता तिने नवे स्‍वप्‍न पाहिले. अथक सरावाच्‍या जोरावर टोकियो पॅरालिंपिकमध्‍ये १० मीटर्स एअर रायफल स्‍पर्धेत तिने सुवर्णपदकावर मोहर उमटवली. अशी स्‍वप्‍नवत कामगिरी करणार्‍या खेळाडूचे नाव आहे अवनी लेखारा. जाणून घेऊया अवनीच्‍या आजवरच्‍या संघर्षमय प्रवासविषयी….

एका दिवसात होताचं नव्‍हतं झालं…

राजस्‍थानमधील जयपूरमध्‍ये राहणार्‍या अवनीचा जन्‍म ८ नोव्‍हेंबर २००१ रोजी झाला. लहानपणापासून तिला खेळाची प्रचंड आवड. खेळकर अवनीचे आयुष्‍य सर्वसामान्‍य मुलींप्रमाणे सुरु होते. अचानक एक दिवस तिच्‍या आयुष्‍याला कलाटणी देणारा ठेरला. २०१२मध्‍ये ती वडिलांसोबत कारने जात असताना भीषण अपघात झाला. वडील प्रवीण लेखारा काही दिवसांमध्‍ये पूर्ण बरे झाले. तर अवनीला अपघातानंतर पॅरेलेसिसचा झटका आला. सर्वांना वाटलं सारं काही संपलं.

अभिनव बिंद्राच्‍या आत्‍मचरित्राने आयुष्‍याला कलाटणी

भीषण संकटातून अवनीने आईवडिलांच्‍या मदतीने स्‍वत:ला सावरले. या काळात तिला आई-वडिलांनीही मोलाची साथ दिली. व्‍हिलचेअरवरुन तिचे नवे आयुष्‍य सुरु झाले. याच काळात तिचे वडील प्रवीण लखेरा यांनी तिला २००८मधील नेमबाजीतील सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याचे आत्‍मचरित्र वाचायला दिले. या पुस्‍तकाने अवनीच्‍या आयुष्‍याल नवी दिशा मिळाली.

संबंधित बातम्या

नेमबाजी हाच तिचा ध्‍यास झाला

अभिनव बिंद्रा याचे आत्‍मचरित्र वाचल्‍यानंतर अवनीने नेमबाजी करण्‍याचा निर्णय घेतला. घरापासूच जवळ असलेल्‍या शुटींग रेंजवर ती सरावाला जावू लागली. काही दिवसांमध्‍येच नेमबाजी हाच तिचा ध्‍यास झाला. मात्र संकटाशी दोन हात करण्‍याचा निर्धार करणार्‍या अवनीने पुन्‍हा नवे स्‍वप्‍न पाहिले. आपल्‍या दिमाखदार कामगिरीने तिने काही वर्षांमध्‍येच नेमबाजीत आपला दबदबा निर्माण केला आणि टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेचे तिकिट फायनल केले.

कोरोनामुळे घरातच सराव…

दीड वर्षांपूर्वी कोरोना प्रार्दूभावामुळे सर्वच खेळाडूंच्‍या सरावावर मर्यादा आल्‍या. अवनीलाही या संकटाला समोरे जावे लागले. मात्र नेमबाजी हा श्‍वास झालेल्‍या अवनीने आपल्‍या वडिलांच्‍या मदतीने घरातच सरार सुरु केला.

त्‍याचबरोबर नियमित जिम आणि योगासन, ध्‍यान याचाही सराव तिने सुरु ठेवला.

प्रशिक्षक चंदन सिंह आणि सुभाष राणा आणि जेपी नौटियाल यांचा मार्गदर्शन लाभले.

हा काळ खूपच कठीण होता. कारण स्‍पर्धा केव्‍हा होईल याबाबत निश्‍चित नव्‍हते.

या काळात अवनीने धैर्य आणि चिकाटीने आपला सराव सुरु ठेवला. आणि भारताला टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्‍याचे स्‍वप्‍न तिने पाहिले.

अवनीचा संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी

१२ व्‍या वर्षी पॅरेलिसिसच्‍या झटक्‍याने अवनीवर मोठा आघात झाला होता. मात्र तिने खेळाला समर्पित केले आज सर्वांसमोर स्‍वत:ला सिद्‍ध केले.

या प्रवासामागे तिचा सर्व संकटांवर मात करणारा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्‍याचे तिचे वडील प्रवीण लखेरा आणि आई श्‍वेता लखेरा सांगतात.

आज अवनीचे नाव सर्वजण अभिमानाने घेत आहेत. याचे श्रेय तिने संकट काळात बाळगलेल्‍या धैर्याला द्‍यावे लागेल, कारण अवनीने केवळ संकटावर मात केली नाही तर स्‍वत:ला कसे सिद्‍ध करावे, याचा आदर्शच आजच्‍या तरुणाईसमाेर ठेवला असल्‍याचेही ते अभिमानाने सांगतात.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ :मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

 

Back to top button