जाणून घ्या, तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता? | पुढारी

जाणून घ्या, तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता?

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चटर्जी यांची मैत्रीण तथा अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने सुमारे 50 कोटी रक्कम आणि 6 किलो सोने जप्त केले. अशावेळी कोणालाही असा प्रश्न पडू शकतो की, एक व्यक्ती नियमानुसार घरात किती रकमेचे सोने ठेवू शकते. आज त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

सुवर्ण नियंत्रण कायदा बत्तीस वर्षांपूर्वीच रद्द

स्वातंत्र्यानंतर देशात एखादी व्यक्ती स्वतःकडे किती सोने ठेवू शकते यासाठी 1968 सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला होता. निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने घरात ठेवण्यावर या कायद्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले होते. तथापि, 1990 नंतर हा कायदा रद्द करण्यात आला आणि लोकांना अधिकृत माहितीसह हवे तेवढे सोने बाळगण्याची मुभा देण्यात आली. मात्र त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत.

  • तुम्ही सोने खरेदी केले असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे तुम्हाला दाखवावी लागतील.
  • कुटुंबाकडून सोने मिळाल्यास कौटुंबिक सेटलमेंटशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतात.
  • जर तुम्हाला भेटवस्तूमध्ये सोने मिळाले असेल, तर त्याच्याशी संबंधित गिफ्ट डीड दाखवावे लागते.

 

 

Back to top button