रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस | पुढारी

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क: टाॅलिवूड आणि बॉलीवूडमधील चर्चित अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि बाहुबली सिनेमात भल्लाळदेवची भूमिका केलेला अभिनेता राणा दग्गुबाती यांना ड्रग्ज प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांच्यासह रवी तेजा, पुरी जगन्नाथ यांनाही नोटीस बजावून ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

चार वर्षे जुन्या प्रकरणात टॉलीवूडच्या टॉपचे अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना समन्स पाठविला आहे.

ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंह , राणा दग्गुबाती, रव‍ि तेजा, पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे.

सर्व अ‍ॅक्टर्सना विविध तारखांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

रकुल प्रीत सिंह हिला सहा सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर, रवी तेजा याला नऊ सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथ याला ३१ सप्टेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

चार्मी कौर, मुमैथसह अन्य लोकांना नोटीस

याशिवाय चार्मी कौर, मुमैथ आणि अन्य लोकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आतापर्यंत १२ लोकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

२०१७ मध्ये टाकला होता छापा

अबकारी विभागाने जुलै २०१७ रोजी एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झडतीत रकुल प्रीतसह अन्य कलाकारांची नावे समोर आली होती.

यातून वेगवेगळी १२ प्रकरणे समोर आली होती. आत्तापर्यंत ११ आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.

रकुल चर्चित अभिनेत्री

टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील चर्चित अभिनेत्री रकुल प्रित सिंह हिने अनेक सिनेमांत काम केले आहे.

‘यारिया’, ‘अय्यारी’, ‘देदे प्यार दे’, ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटांत काम केले आहे.

तर बाहुबली या सिनेमातील व्हिलन भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती हा प्रसिद्ध चेहरा आहे.

त्याने ‘गाझी अ‍ॅटॅक’, ‘बेबी’, ‘दम मारो दम’, ‘हाथी मेरे साथी’ या हिंदी सिनेमात काम केले आहे.

हेही वाचा:

Back to top button