Gold Price Today : सोने झाले स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव - पुढारी

Gold Price Today : सोने झाले स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोने आणि चांदी दरात (Gold Price Today)  आज बुधवारी (दि. २५) पुन्हा घसरण झाली. मंगळवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याचा भाव ((Gold Price Today) १५५ रुपयांनी स्वस्त होऊन ४७,५५५ रुपये (प्रति १० ग्रॅम) झाला. तर चांदीचा दर प्रति किलोमागे ३६ रुपयांनी कमी झाला.

बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५५५ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,३६५ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,५६० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,६६६ रुपये एवढा होता.

चांदीचा प्रतिकिलोमागे दर ६३,४१४ रुपये एवढा होता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी चांदी दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याला मागणी वाढणार असल्याने दिवाळीपर्यंत सोने ५० हजारांवर जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एमसीएक्सवर देखील दर घसरले…

दरम्यान, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचे दर बुधवारी घसरल्याचे दिसून आले. एमसीएक्सवर सोन्याचा दर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ४७,३६७ रुपये होता. तर चांदीच्या दरातही घसरण दिसून येत असून प्रति किलो दर ६३,०६५ रुपये एवढा आहे.
मंगळवारी डॉलर कमकुवत झाला असतानाही सोने आणि चांदीचे दर स्थिर होते. मात्र, बुधवारी त्यात घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचे दर उतरले आहेत. सोन्याचा दर ०.४ टक्क्याने घसरून प्रति औंस १,७९६ डॉलरवर तर चांदीचा दर प्रति औंस २३.७३ डॉलरवर पोहोचला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या २४ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव

गेल्या वर्षी सोने उच्चांकी पातळीवर म्हणजे ५६ हजारांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचले होते. सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ हजार रुपयांनी कमी आहे.

सोने या महिन्यात ४५,६०० रुपयांवर आले होते. गेल्या चार महिन्यांतील हा निच्चांकी दर आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button