e-Pan Card Download : काही मिनिटांत e-Pan डाउनलोड करा, अतिशय सोपी प्रक्रिया

e-Pan Card Download : काही मिनिटांत e-Pan डाउनलोड करा, अतिशय सोपी प्रक्रिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : परमनंट अकाऊंट नंबर (permanent account number) किंवा पॅन कार्ड (PAN card) हे आजचे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आजकाल सरकारी ते खाजगी काम करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड मिळवण्यापर्यंत किंवा आयटीआर (Income Tax Return) भरण्यापर्यंत सर्वत्र पॅन कार्ड अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आयटीआर रिटर्न (IT Return) भरायचे असेल परंतु पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला ते काही मिनिटांत मिळू शकते. होय..तुम्ही इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड किंवा ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. आज अनेक वित्तीय संस्था फक्त ई-पॅन कार्ड स्वीकारतात. हे खूप सोयीचे आहे. (e-Pan Card Download)

'पीआयबी हिंदी'चे ट्विट…

आयकर दिनानिमित्त 'पीआयबी हिंदी'च्या वतीने आज एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, 'करदात्यांच्या सोयीसाठी एक नवीन पाऊल. तुमचा पॅन त्वरित मिळवा. प्रतीक्षा करू नका. 'झटपट' नवीन 'सामान्य' आहे.' आता आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून काही मिनिटांत ई-पॅन मिळवता येईल. (e-Pan Card Download)

ई-पॅन कसे डाउनलोड करावे?

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला आयकराच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्ही Instant e-PAN पर्याय निवडा.

यानंतर तुम्ही New e-PAN पर्याय निवडा. येथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक विचारला जाईल. तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका.

तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक देखील टाकू शकता.

यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या अटी व शर्ती दिल्या जातील. ते वाचा आणि नंतर Accept पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका.

त्यानंतर सर्व तपशील तपासा आणि नंतर Submit ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर (e-mail ID) तुम्हाला पॅनची PDF पाठवली जाईल. ही PDF डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही हा ई-पॅन डाउनलोड करा. (e-Pan Card Download)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news