पंचाहत्तर वर्षांनंतर पुण्याहून पाकिस्तानात | पुढारी

पंचाहत्तर वर्षांनंतर पुण्याहून पाकिस्तानात

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील पुणे येथील 90 वर्षांच्या रिना छिब्बर वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत. रिना यांचे वडिलोपार्जित घर (प्रेमनिवास) आजही रावळपिंडीत आहे.

रिना आपले हे घर पाहण्यासाठी आणि बालमित्रांच्या भेटीसाठी येथे आल्या आहेत. 1947 मध्ये झालेल्या फाळणीच्या वेळी रिना यांना सहकुटुंब रावळपिंडी सोडून भारतात यावे लागले होते. पाकिस्तानने त्यांना 3 महिन्यांचा व्हिसा दिला आहे. याआधीही रिना यांनी व्हिसासाठी पाककडे अनेक अर्ज केले होते; पण त्यांना तो मिळू शकला नव्हता. फाळणीच्या वेळी त्या 15 वर्षांच्या होत्या. दोन्ही देशांनी व्हिसा धोरण सहजसुलभ करावे, अशी रिना यांची भूमिका आहे.

Back to top button