SUV बाजारात टाटा मोटर्सचा 'पंच', पहा नव्या एसयूव्हीची झलक | पुढारी

SUV बाजारात टाटा मोटर्सचा 'पंच', पहा नव्या एसयूव्हीची झलक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Tata Motors Micro SUV Tata Punch HBX टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स (HBX) वरून मोठा खुलासा केला आहे. टाटाने सोमवारी या बहुचर्चित कारची एक झलक दिली.

या एसयूव्हीचे नाव टाटा पंच (Tata Punch) असे ठेवण्यात आले आहे. ही टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही असू शकते आणि ती अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक
टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक

कंपनी लवकरच ही मायक्रो एसयूव्ही टाटा पंच लाँच करणार आहे.

टाटा मोटर्सचा दावा आहे की ही मायक्रो एसयूव्ही प्रत्येक कार चाहत्याच्या पसंतीस पडेल. उल्लेखनीय म्हणजे, ही टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त एसयूव्ही असू शकते.

कंपनीने २१ ऑगस्ट २०२१ रोजी एचबीएक्स (HBX)चा पहिला टीझर व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया पेजद्वारे रिलीज केला आणि हे उघड केले की ती लवकरच ही छोटी एसयुव्ही (SUV) भारतात लॉन्च करणार आहे.

अधिक वाचा :

टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक
टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक

टाटा कंपनीच्या या एसयूव्हीला देशातील रस्त्यांवर चाचणी करताना अनेक वेळा पाहिले गेले. उल्लेखनीय म्हणजे, टाटा ‘पंच’च्या वैशिष्ट्यांविषयी बरीच चर्चा आहे. गेल्या वर्षी टाटा पंचचे कॉन्सेप्ट मॉडेल कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केले होते.

ही टाटाची पहिली एसयुव्ही (SUV) असेल जी चपळ, वजनाने हलकी, लवचिक, प्रगत, आकर्षक आर्किटेक्चर (Agile Light Flexible Advanced Architecture म्हणजेच ALFA-ARC) वर आधारित असेल आणि इम्पॅक्ट २.० डिझाईन भाषेअंतर्गत विकसित केली जाईल. कंपनीचा तरुण ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा :

टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक
टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक

टीझरमधून हे ज्ञात होते की टाटा पंचला टाटा हॅरियर आणि टाटा सफारी मॉडेल्स सारखेच डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) मिळतील. तसेच हेडलॅम्प क्लस्टर असेल. कंपनीने सूचित केले आहे की, एसयुव्ही कारला आवश्यक असणारी फिचर्स एकाच ठिकाणी असतील. याचा अर्थ कारच्या डिझाइनमध्ये भरपूर वैविध्य असेल.

टाटा पंचच्या अपेक्षित लुक आणि फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर ते दिसायला बऱ्यापैकी मस्कुलर असेल आणि त्याचा टायर आणि रियर लूक खूप आकर्षक असू शकतो. एचबीएक्स ही कार १.२-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे धावेल, हे इंजिन टाटाच्या अल्ट्रॉझ या कारमध्ये देण्यात आलं आहे. हे इंजिन ६००० आपीएम (rpm) वर ८४ बीएचपी (bhp) पॉवर तर ३३०० आरपीएम (rpm) वर ११३ एनएम (Nm) टॉर्क जनरेट करु शकेल. ही गाडी ५ स्पीड मॅनुअल आणि एएमटीसह सादर केली जाऊ शकते.

टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक
टाटा मोटर्सच्या मायक्रो एसयूव्ही एचबीएक्स पंच कारची आकर्षक झलक

अशी अपेक्षा आहे की कंपनी त्याची किंमत खूप आकर्षक ठेवेल आणि ती महिंद्रा केयुव्ही १०० (KUV 100) आणि मारुती सुझुकी इग्निसशी स्पर्धा करू शकते. ह्युंदाईच्या आगामी मायक्रो एसयूव्ही कॅस्परशीही स्पर्धा करू शकते. टाटा मोटर्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली असून अपकमिंग एसयूव्हीचा टीझर व्हिडिओही शेअर केला आहे.

आकर्षक स्पोर्टी लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सजलेल्या या एसयूव्हीचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही मायक्रो एसयूव्ही आज अधिकृतपणे भारतात सादर होणार आहे. एका अहवालानुसार, टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात दोन नवीन वाहने बाजारात आणण्याची योजना आखली आहे आणि यात बहुप्रतिक्षित हॉर्नबिलचा (Hornbill) समावेश आहे, जी नियमित हॅचबॅकपेक्षा थोडी मोठी म्हणजेच मायक्रो एसयूव्ही असेल. कोडनेम HBX सह टाटा हॉर्नबिल (Tata Hornbill) पहिल्यांदा 2019 जिनेव्हा मोटर शो दरम्यान पाहायला मिळाली होती.

Back to top button