Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचा भाव - पुढारी

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात आज सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) सोने (Gold Price Today) आणि चांदी दरात काही प्रमाणात घसरण झाली. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोने २३ रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर ४७,३०६ रुपये एवढा झाला आहे. तर चांदीच्या दरातही ३१ रुपयांची घसरण दिसून आली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) २४ कॅरेट सोन्याचा (Gold Price Today) भाव ४७,३०६ रुपये (प्रति १० ग्रॅम) एवढा होता. तर २३ कॅरेट सोने ४७,११७ रुपये २२ कॅरेट सोने ४३,३३२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,४८० रुपये एवढा आहे.

चांदीचा प्रति किलो भाव ६२,२०२ रुपये एवढा आहे. चांदी दर ३१ रुपयांनी कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याच्या स्पॉट दरात आज घसरण दिसून आली. स्पोट गोल्ड दरात आज ०.१ टक्के घसरण झाली. यामुळे सोने प्रति औंस १,७७९ डॉलरवर आले. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).

सराफ
gold file photo

गेल्या वर्षी सोने उच्चांकी पातळीवर म्हणजे ५६ हजारांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचले होते. सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ हजार रुपयांनी कमी आहे.

सोने या महिन्यात ४५,६०० रुपयांवर आले होते. गेल्या चार महिन्यांतील हा निच्चांकी दर आहे. पण आता सोने दरात सुधारणा होत आहे.

पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. विशेषतः दिवाळीत सोने दराला झळाळी मिळणार असल्याचे संकेत सराफा बाजारातील तज्ज्ञांनी दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोन्याच्या शुद्धतेवरुन सरकार गंभीर विचार करत आहे. त्यासाठी सोने वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेला हॉलमार्किंग म्हटले जाते. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना सोने शुद्ध असल्याचे कळते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण |

Back to top button