वरवरा राव यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी | पुढारी

वरवरा राव यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांच्या स्थायी जामीन अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव स्थायी जामीन दिला जावा, ही राव यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या आदेशाला राव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.

पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली ; 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर जखमी

या प्रकरणाच्या अनुषंगाने काही कागदपत्रे सादर करावयाची आहेत, त्यामुळे सुनावणी मंगळवारी घेतली जावी, अशी विनंती सरकारी पक्षाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे केली. राव यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी त्याला कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर खंडपीठाने सुनावणी मंगळवारी होईल, असे स्पष्ट केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button