
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप झालेल्या पत्रकार रोहित रंजन (Rohit Ranjan) यांना पुढील आदेशापर्यंत अटक करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी दिले. रोहित यांना चालू आठवड्याच्या सुरुवातीला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने लगेचच त्यांना जामीन दिला होता.
गत मंगळवारी छत्तीसगड पोलिसांचे एक पथक रोहित (Rohit Ranjan) यांना अटक करण्यासाठी नोएडामध्ये आले होते. रोहित यांना अटक करून गाडीत बसविले जात असतानाच गाझियाबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन रोहित यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी छत्तीसगड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची जोरदार वादावादी झाली होती. या पार्श्वभूमीवर अटकेपासून दिलासा दिला जावा, असे सांगत रोहित यांनी अॅड. सिद्धार्थ लुथरा यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हेही वाचलंत का ?