Kaali Controversy : ममतादीदींचा स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला तोंड बंद ठेवण्याचा इशारा?

Kaali Controversy : ममतादीदींचा स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला तोंड बंद ठेवण्याचा इशारा?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'काली' या माहितीपटाचे पोस्टर आणि टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून वाद वाढत आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसीवर देवी कालीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसंच टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मोईत्रा यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (kaali controversy tmc mp mahua moitra unfollows official tmc twitter handle)

वास्तविक, महुआ मोइत्रा मंगळवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट 2022 मध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान त्यांनी 'काली' या महितीपटाच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, देवी कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांस आणि वाईन प्राशन करणारी देवी असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मोईत्रा यांच्याकडे टीएमसीने पाठ फिरवली असून देवी काली विषयी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तीक असून ती पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मोईत्रा यांच्या विधानाचा निषेधही केला आहे. (tmc mp mahua moitra and kaali controversy)

पक्ष आपल्या पाठीशी नसल्याचे समोर येताच खासदार मोईत्रा याही भडकल्या आहेत. त्यांनी चक्क तृणमूल काँग्रेसचे (TMC) ट्विटर हँडल अनफॉलो केले आहे.

'कालीची अनेक रूपे'

महुआ मोईत्रा म्हणाल्या की, 'तुम्ही तुमच्या इश्वराला कसे पाहता? भूतान आणि सिक्कीमला गेलात तर सकाळच्या पूजेत देवाला व्हिस्की अर्पण केली जाते, पण उत्तर प्रदेशातील एखाद्याला ही व्हिस्की देवाचा प्रसाद म्हणून दिली तर त्याच्या भावना दुखावू शकतात. माझ्यासाठी देवी काली मांसाहार आणि मद्यपान प्राशन करणाऱ्याच्या रूपात आहे. काली देवीची अनेक रूपे आहेत,' असे म्हटले होते.

बंगाल भाजपने आघाडी उघडली

महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यावर बंगाल भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेते राजर्षी लाहिरी यांनी कोलकाता येथील रवींद्र सरोबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोइत्रा यांनी एका कार्यक्रमात देवी काली ही मांस आणि मद्य प्राशन करते असे विधान करून त्यांनी मुद्दाम आमच्या धर्म आणि धार्मिक श्रद्धांचा अवमान केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कालीदेवीचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य करण्यात आल्याचे भाजप नेत्याने तक्रारीत म्हटले आहे. सध्या पश्चिम बंगाल राज्यात सर्वत्र जातीय हिंसाचार सुरू असून मालमत्तेची नासधूस केली जात आहे. पोलिस योग्य पद्धतीने काम करत नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे. (tmc mp mahua moitra and kaali controversy)

शुभेंदू अधिकारी यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर निशाणा साधला

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आम्ही बंगाली लोक माँ दुर्गा देवीनंतर माँ कालीला शक्ती मानतो. कालीपूजेत उपवास न ठेवणारा बंगाली क्वचितच सापडेल. टीएमसी पक्षाने काय केले यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण बंगाल पोलिसांना अशोक स्तंभाविषयी जराही आदर असेल तर ज्या पद्धतीने त्यांनी नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई सुरू केली, देशभरात त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले, त्याच प्रमाणे बंगाल पोलिसांनी मोईत्रा यांच्य विरुद्ध कारवाई करावी अशी माझी मागणी असल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news