दिल्‍लीतील बाजारपेठांवरील वेळेचे निर्बंध हटवले | पुढारी

दिल्‍लीतील बाजारपेठांवरील वेळेचे निर्बंध हटवले

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: कोरोना रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात आल्‍यामुळे सोमवारपासून दिल्‍लीतील सर्व बाजारपेठा खुल्‍या होणार आहेत. दिल्‍लीतील सर्व बाजारपेठा सामान्‍य वेळांमध्‍ये खुल्‍या होतील, अशी माहिती मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिली.

मे महिन्‍यात दिल्‍लीमध्‍ये कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेने कहर केला होता. वाढत्‍या संसर्गामुळे येथे कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करण्‍यात आली. मागील काही महिन्‍यांपासून निर्बंध कायम होते.

मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्‍यात आली होती. दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्‍याची परवानगी देण्‍यात आली होती.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्‍णसंख्‍येत घट झाली आहे. त्‍यामुळे आता सोमवारपासून (दि.२३) पुन्‍हा एकदा पूर्वीच्‍या वेळेनुसार नियमितपणे दुकाने सुरु ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button