वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची चाकू भोसकून हत्या | पुढारी

वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची चाकू भोसकून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : वास्तूशास्त्र तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची चाकू भोकसून हत्या करण्यात आली. ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकयेथील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर गुरुजी कामानिमित्त हॉटेलमध्ये आले होते.

हत्येाचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजमध्ये असे दिसते की, हॉटेलमधील रिसेप्शनजवळ चंद्रशेखर गुरुजी यांना हल्लेखोरांनी चाकूने वार केल्याचे दिसत आहे. यानंतर रिसेप्शनजवळ असणारे लोक पळताना दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर हल्ला केलेल्या गुन्हेगारांचा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्तही घटनास्थळी दाखल झाले. अद्याप हत्येचे कारण समजले नाही. तपासानंतरच हत्येमागचं कारण समजू शकेल. अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

कोण होते चंद्रशेखर गुरुजी ?

चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे बालगकोट येथील होते. करिअरची सुरूवात त्यांनी कंत्राटदार म्हणून  केली. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते तिथेच स्थायिक झाले. यानंतर त्यांनी वास्तूशास्त्राचा व्यवसाय सुरु केला.

Back to top button